Type Here to Get Search Results !

अर्ज विणकर कुटुंबाना 200 युनिट पर्यंत फ्री लाईट | Hatmag Vinkar Mofat Light Yojana 2023

 Hatmag Vinkar Mofat Light Yojana :- नमस्कार मित्रांनो, हातमाग विणकर कुटुंबांना प्रत्येक महिन्याला 200 युनिट पर्यंत मोफत (Free) वीज दिली जाणार आहे, त्या संदर्भात नवीन जीआर काढण्यात आलेला आहे. या मध्ये  आपण हातमाग विणकारांची पात्रता काय आहे? या योजनेचे अंमलबजावणी कशी होणारे याची सर्व माहिती घेणार आहोत. राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वाढीस चालना देण्यासाठी दिनांक 02/06/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-2028 जाहिर केलेले आहे. सदर धोरणाचे हातमाग विणकरांना उपजिविकेचे संरक्षण सुनिश्चित करुन हातमाग वस्त्रोद्योग विणकरांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या दृष्टिने अतिरिक्त प्रोत्साहन देणे हे एक उद्दिष्ट आहे.



Hatmag Vinkar Mofat Light Yojana Details
Plan Hatmag Vinkar Mofat Light Yojana
Started Maharashtra Gov
Year 2023
beneficiary A family of handloom weavers
Apply Process Offline
Update 2023-2028

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana

सदर धोरणातील परिच्छेद क्र. ७.४ मध्ये हातमाग विणकरांच्या कुटुंबाना प्रतिमाह 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येईल असे नमूद केले आहे. सदर अनुषंगाने हातमाग विणकरांच्या कुटूंबाना प्रतिमाह 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 नुसार हातमाग विणकरांना उपजिविकेचे संरक्षण सुनिश्चित करुन हातमाग वस्त्रोद्योग विणकरांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या • दृष्टिने अतिरिक्त प्रोत्साहने देण्याच्या अनुषंगाने हातमाग विणकर कुटुंबाना प्रतिमाह २०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

Hathmag Vinkar Mofat Vij Yojana चे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील हातमाग वस्त्रोद्योग विणकर कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana चे लाभ

  • या योजनेअंतर्गत हातमाग वस्त्रोद्योग विणकर कुटुंबांना प्रतिमहिना 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येते.

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana चे फायदे

  • हातमाग वस्त्रोद्योग विणकर कुटुंबांना मोफत वीज मिळेल.
  • विणकर कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करून त्यांचे जीवनमान सुधारेल.
  • हातमाग वस्त्र विणकर त्यांचा पारंपारिक उद्योग सुरु ठेवण्यासाठी प्रोत्साहित होतील.
  • विणकर कुटुंबांना हातमाग वस्त्रोद्योग सुरु ठेवण्यासाठी चालना मिळेल.

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana अंतर्गत पात्रता व अटी

  • अर्जदार हातमाग विणकर हा केंद्र शासनाच्या सर्वात अलीकडचे हातमाग अंतर्गत नोंदणीकृत विणकर असावा व त्यांच्याकडे तसे ओळखपत्र असावे.
  • एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो.
  • अर्जाच्या दिनांकापूर्वी 6 महिन्यापासून विणकर व्यवसायात कार्यरत असावा. विणकाम करत असल्याचा मागील 6 महिन्याचा पुरावा म्हणून कच्चा माल खरेदीचे बील/पक्का माल विक्रीचे बील/महामंडळ, महासंघ अथवा संस्थेचा सभासद असल्यास सदर विणकरास विणकाम मजूरी दिल्याबाबत संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • अर्जदाराकडे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला असणे आवश्यक
  • अर्जदार हातमाग विणकर कुटुंबाचे नावे वीज जोडणी असावी.
  • हातमाग विणकरांच्या कुटुंबाना दरमहा 1 ते 200 युनिट पर्यंत (200 युनिट) मोफत वीज शासनामार्फत देण्यात येईल त्यापेक्षा जास्त म्हणजे 200 युनिटच्या वर वापर झालेल्या बीलाची रक्कम स्वत: लाभार्थ्याला भरावी लागेल.
  • विणकर कुटुंबाने वीज बील देयकाची रक्कम नियमीत भरणा करणे गरजेचे राहिल. विलंब बील भरणा आकारणीची रक्कम शासनाकडून देय होणार नाही.
  • सदर योजनेतील लाभार्थी हातमाग विणकरांचा शासन यंत्रणेद्वारे नियमित आढावा घेण्यात येईल. सदर आढाव्यामध्ये हातमाग व्यवसाय सोडला असल्याचे आढळून आल्यास असा लाभार्थी वीज अनुदान सवलतीस पात्र राहणार नाही.

Hathmag Vinkar Mofat Light Yojana अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • विणकर ओळखपत्राची स्व प्रमाणित प्रत
  • आधार कार्डची स्व प्रमाणित प्रत
  • रहिवासी दाखला
  • हातमाग महामंडळ / विणकर हातमाग सहकारी संस्थेचा सभासद असल्यास-
    (a) मागील 6 महिन्याची विणकाम मजूरी दिल्याबाबतचे प्रमाणपत्र.
    (b) खाजगी विणकर असल्यास तो उत्पादीत करीत असलेल्या वाणाचा प्रकाराबाबत स्वघोषणा पत्र.
    (c) विणकाम करत असल्याचा पुरावा म्हणून कच्चा माल खरेदी बील/पक्का माल विक्रीचे बील.
  • विजेचा वापर केवळ त्यांचे कुटूंबासाठीच करण्यांत येईल. वीजेचा गैरवापर ( इतरांना वीज पुरवठा करणे/ हातमाग व घरगूती वापराशिवाय इतर व्यवसायासाठी विजेचा वापर करणे) केल्याचे आढळल्यास विज अनूदान बंद करणे किंवा पुढील कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील असे स्वघोषणा पत्र.
  • विणकराचा अलीकडचा फोटो.
  • मागील 3 महीन्याचे वीज बील.

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदार विणकराला आम्ही खाली अर्ज दिला आहे तो डाउनलोड करून त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज प्रादेशिक उपायुक्त यांचे जवळ (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) जमा करावा लागेल.

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana अंमलबजावणी

  • प्राप्त झालेले अर्ज संबंधित प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग व विणकर सेवा केंद्र यांचे कार्यालयातील तांत्रिक अधिकारी / कर्मचारी हे सदर अर्जदार विणकर व्यवसाय करीत असल्याची स्थळ तपासणी करतील. संबंधित प्रादेशिक उपायुक्त (वस्त्रोद्योग) प्राप्त अर्जांची छाननी व तपासणी करुन आपल्या शिफारशींसह हातमाग विणकरांची यादी आयुक्त (वस्त्रोद्योग) वस्त्रोद्योग आयुक्तालय, यांना मंजूरीसाठी सादर करतील.
  • प्रादेशिक उपायुक्त,वस्त्रोद्योग यांचे कार्यालयाकडून प्राप्त अर्ज गठीत समिती समोर ठेवण्यात येतील.
  • सदर समितीची बैठक दरमहा आयोजित केली जाईल. बैठकीमध्ये प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र अर्जदारास वीज सवलत सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात येईल व पुढील कार्यवाहीसाठी महावितरण कंपनीला कळविण्यात येईल.
  • महावितरण कंपनी मार्फत प्रत्येक तिमाहीला देण्यात आलेली वीज सवलत विभागाकडे मागणी केली जाईल. सदर रक्कम विभागाकडून महावितरण कंपनीला त्यांनी दिलेल्या खात्यावर आयुक्त वस्त्रोद्योग यांचे मार्फत RTGS/ धनादेशाद्वारे वर्ग करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.